बीड- संपूर्ण देशभरात मार्च 2020 पासून कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक हतबल झाला आहे. अशा परिस्थितीत रेमडेसिवीरसह इतर औषधांवरील कर केंद्र व राज्य सरकारने कर माफ करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.
संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर म्हणाले, की मागील वर्षभरापासून कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. अनेक गोरगरिबांच्या हाताचे काम गेले आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यावर खर्च करत असताना महागडी औषधे व गोळ्या विकत घ्यावी लागत आहेत. अनेक गोरगरिबांना तर महागड्या औषधांमुळे चांगले उपचार घेणे अशक्य होत आहेत. या सगळ्या बाबींचा विचार करून केंद्र व राज्य सरकारने महाराष्ट्रात मेडिसिनवर लावत असलेला कर माफ करावा. जेणेकरून नागरिकांना कमी खर्चात उपचार करणे शक्य होईल.
हेही वाचा-यवतमाळ : दारुची तल्लफ भागविण्याकरता सॅनिटायझर पिल्याने आणखी एकाचा मृत्यू