बीड- तालुक्यातील साखरे बोरगाव येथे तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, संबंधित क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. याठिकाणी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
साखरे बोरगाव कंटेनमेंट झोन घोषित; अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू - sakhre borgaon containment zone
साखरे बोरगाव येथे तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बीड तालुक्यातील साखरे बोरगावपासून 3 किलोमीटरचा परिसर म्हणजेच वाणगांव व गोगलवाडी हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला.
साखरे बोरगाव कंटेनमेंट झोन घोषित
कोरोना रुग्णांचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सादर केला आहे. यानंतर जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी बीड तालुक्यातील साखरे बोरगावपासून 3 किलोमीटरचा परिसर म्हणजेच वाणगांव व गोगलवाडी हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला. वरील सर्व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात आले असून याठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.