अंबाजोगाई:तीन दिवसीय साहित्य संमेलन येथील टी.बी. गिरवलकर अभियांत्रिकी महाविद्यालयात (Girwalkar Engineering College) चित्रकार दिलीप बडे (Chitrkar Dilip Bade) साहित्य नगरीतील सुर्यकांत गरुड विचारपीठावर होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन १९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते होत आहे. या पार्श्वभूमीवर दुपारी ३ वाजता जागर दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. जागर दिंडीची सुरवात ज्येष्ठ नागरिक सौ. कमल बरुरे आणि एस.बी. सैय्यद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जागर दिंडी रमाई आंबेडकर चौक, यशवंतराव चव्हाण चौक, मोरेवाडी मार्गे अभियांत्रिकी महाविद्यालयात पोचणार आहे. या दिंडीचे संयोजन डॉ. उध्दव शिंदे हे करणार आहेत.
चित्र आणि ग्रंथ प्रदर्शन: परीसरात प्रा. दिलीप बडे यांच्या चित्रांचे प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, प्राचार्या डॉ. अखिला गौस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. राहुल धाकडे आहेत. संमेलनाचा उद्घाटन संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी प्रा. डॉ. दासू वैद्य (Dasu Vaidya) तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ अभिनेते डॉ. दिलीप घारे (Dilip Ghare) यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. कमलाकर कांबळे, स्वागताध्यक्ष डॉ. बी. आय. खडकभावी, मसाप चे अध्यक्ष दगडु लोमटे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार, लेखक अमर हबीब यांना नंदा देशमुख स्मृती कथालेखक पुरस्कार, प्रा.डॉ. अलका वालचाळे यांना प्रा. शैला लोहिया स्मृती लेखिका पुरस्कार, प्रा. डॉ. देविदास खोडेवाड यांना डॉ. संतोष मुळावकर स्मृती शिक्षक लेखक पुरस्कार देऊन गौरविण्यात करण्यात येणार आहे.
कथाकथनाने पहिल्या सत्राची सुरुवात : १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता या साहित्य संमेलनातील कथाकथन या पहिल्या सत्रास सुरुवात होणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक गोरख शेंद्रे हे राहणार असून या सत्रात हरीश कस्पटे यांचा सहभाग असणार आहे. या सत्राचे संयोजक अर्चना स्वामी या राहणार आहेत. सायंकाळी ८ वाजता आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या सत्रात अनिवासी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. संतोष कुलकर्णी असणार आहेत. तर सहभागी कवीमध्ये अलीम अजीम, डॉ. सिद्धोधन कांबळे बलराज संघई अनुपमा मोटेगावकर रचना स्वामी अविनाश भारती अस्मिता जोगदंड चांदणे उषा भालेराव प्रज्ञा आपेगावकर रत्नदीप शिंदे सत्र संयोजक प्रा. विष्णू कावळे यांचा सहभाग असणार आहे.
निवासी कवी संमेलन : या नंतर होणाऱ्या सत्रात निवासी कवी संमेलन होणार असुन त्याच्या अध्यक्षस्थानी गणपत व्यास असणार आहेत. यात निशा चौसाळकर, अतहर हुसैन, संध्या सोळंके-शिंदे, रविंद्र पांडे, अर्चना मुंदडा, तिलोत्तमा इंगोले, राजेश रेवले, अंजली भंडारी, अत्तम राठोड, रमेश मोटे, राज पठाण, गोविंद हाके, डॉ. राजेश्वर कुकुंदा यांचा सहभाग राहणार आहे. या सत्राच्या संयोजिका रेखा देशमुख असणार आहेत.
संमेलनाध्यक्षांचे साहित्य : संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता तिसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्षांचे साहित्य या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परीसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक बालाजी सुतार राहणार असून कृष्णा किंबहुने हे दासू वैद्य यांचे मराठी साहित्यातील स्थान या विषयावर तर डॉ. दिपक गरुड हे दृकश्राव्य साहित्य तर गोपाळ तिवारी हे गद्यलेखन या विषयावर व्यक्त होणार आहेत. या सत्राचे संयोजन प्रा. डॉ. देविदास खोडेवाडहे करणार आहेत.