बीड- पुणे ते बीड वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सने रविवारी पहाटे १ वाजताच्या दरम्यान पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडीत अचानक पेट घेतला. यामध्ये ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. चालकाच्या सावधानतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
बीड ते पुणे वाहतूक करणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सला आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरुप - बीड
बीडमधील सागर ट्रॅव्हल्स (क्रमांक ६००२) पुण्याकडे प्रवासी घेऊन जात होती. रविवारी पहाटे १ वाजताच्या दरम्यान पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडीत अचानक पेट घेतला.

सागर ट्रॅव्हल्स १
बीडमधील सागर ट्रॅव्हल्स (क्रमांक ६००२) पुण्याकडे प्रवासी घेऊन जात होती. अचानक रात्री १ वाजताच्या दरम्यान ट्रॅव्हलने अचानक पेट घेतला. ड्रायव्हरने सावधानता बाळगत गाडी थांबवून प्रवाशांना खाली उतरवले. चालकाच्या प्रसंगावधानतेमुळे सर्व प्रवाशांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला. संबंधित ट्रॅव्हलला आग लागल्याची माहिती मिळताच अंमळनेर ठाण्याचे पोलीस कर्मचारी सानप, गडवे आदींनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांची मदत केली.