महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परळी शहर बायपासच्या चौपदरी निर्माणासाठी ६०.२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर - धनंजय मुंडे लेटेस्ट न्यूज बीड

केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने परळी शहर बायपासच्या चौपदरी निर्माणासाठी ६०.२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ परळी बायपास या भागाचे चौपदरीकरण करण्यासाठी ६०.२३ कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा आज ट्विटरद्वारे केली आहे.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

By

Published : Apr 4, 2021, 10:58 PM IST

परळी -केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने परळी शहर बायपासच्या चौपदरी निर्माणासाठी ६०.२३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ परळी बायपास या भागाचे चौपदरीकरण करण्यासाठी ६०.२३ कोटी रुपयांची तरतूद केल्याची घोषणा आज ट्विटरद्वारे केली आहे. दरम्यान या कामाची निविदा प्रक्रिया सुद्धा पूर्ण झाल्याचे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

तीन वेळा झाले आहे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

यापूर्वी देखील या मार्गाचे भूमिपूजन तीनवेळा झाले आहे. मात्र कामासाठी निधी मंजूर न झाल्याने काम रखडले होते, आता निधी मंजूर झाल्याने कामाल गती मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान केंद्राच्या मागील अर्थसंकल्पाच्या काळात धनंजय मुंडे यांनी या रस्त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधी मंजूर करण्याबाबत विनंती केली होती, ती मान्यही झाली होती परंतु कोविडमुळे लागलेल्या निर्बंधांमध्ये या कामास आवश्यक निधी प्राप्त होऊ शकला नव्हता. त्यानंतर आता नितीन गडकरी यांनी या कामासाठी 60 कोटी 23 लाखांचा निधी मंजूर केला आहे.

हेही वाचा -पोहण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details