बीड - परजिल्ह्यातील लोकांना रस्त्यात लाकडे आडवी टाकून गावबंदी का केली? असे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ लोकांनी जिल्हाबंदीचा आदेश धुडकावून केज तालुक्यातील लाखा या गावात येत दोघांना मारहाण केल्याची घटना समोर आली. यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सदरील प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
गावात नाकाबंदी केली म्हणून आठ जणांकडून दोघांना बेदम मारहाण - beed corona update
चेक पोस्ट तयार करून तुम्ही बाहेर जिल्ह्यातील लोकांना प्रवेश का नाकारला? असे म्हणून ताहेर शाकेर पठाण (वय २३) यास लाखा शिवारात परशुराम रावसाहेब घाडगे यांच्या शेताजवळ शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांड्यानी डोक्यात मारून दुखापत केली.
केज तालुक्यातील लाखा येथे १० एप्रिलला सायंकाळी ७:०० वाजण्याच्या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील युसुफ महेबूब शेख, ताहेर युसुफ शेख, शाहेद युसुफ शेख, जुबेर रौफ शेख व इतर अनोळखी चारजण यांनी जिल्हा बंदीचा व कोव्हिड-१९ साथरोग प्रतिबंधक कायदा आदेश डावलून दोन चारचाकी वाहने व मोटारसायकलवरून बीड जिल्हा हद्दीत प्रवेश केला. बीड जिल्हा हद्दीतील लाखा येथील गावकऱ्यांनी चेक पोस्ट तयार करून तुम्ही बाहेर जिल्ह्यातील लोकांना प्रवेश का नाकारला? असे म्हणून ताहेर शाकेर पठाण (वय २३) यास लाखा शिवारात परशुराम रावसाहेब घाडगे यांच्या शेताजवळ शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लाकडी दांड्यानी डोक्यात मारून दुखापत केली.
या प्रकरणी ताहेर शाकेर पठाण यांच्या तक्रारीवरून युसुफ महेबुब शेख, ताहेर युसुफ शेख, शाहेद युसुफ शेख, जुबेर रौफ शेख व इतर अनोळखी चारजण हे सर्व (रा शिराढोण ता. कळंब जि उस्मानाबाद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.