बीड :मयत शरद भारत मेंगडे (वय 25 रा. सफेपुर ता. बीड) असे युवकाचे नाव (Road Accident Beed) असून चार चाकी कार असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळापासून जवळच हुंडाई कारचा साईड ग्लास तुटलेला भाग मिळाल्याने ते वाहन कारच (youth killed in accident ) असल्याचा अंदाज नेकनूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Manjarsumba Cage Road accident)
Road Accident Beed : मांजरसुंबा केज रस्त्यावर अपघातात 25 वर्षीय तरुण ठार - अपघातात युवक जागीच ठार
मांजरसुंबा पासून (Road Accident Beed) काही अंतरावर रत्नागिरी पाटीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत 25 वर्षीय युवक जागीच ठार (youth killed in accident ) झाल्याची घटना काल शुक्रवार रात्री 7.00 वाजण्याच्या सुमारास घडली. तरुणाच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने ओळख पटणे अवघड झाले होते. मात्र पायातील बोटामुळे ओळख पटवण्यात स्थानिक नागरिकांनी पोलिसांना मदत केली. (Manjarsumba Cage Road accident)
अपघातात 25 वर्षीय तरुण ठार
अपघातांचे प्रमाण वाढतीवर :या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी नेकनूर ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. दरम्यान या रोडवर अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने प्रशासनाने यावर योग्य ती पावले उचलावीत, अशीच मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.