बीड- स्त्री संताच्या नेतृत्वाचे दर्शन घडवणारी 350 वर्षांची अखंड परंपरा जोपासणाऱ्या संत मुक्ताबाईंच्या दिंडीचे शनिवारी बीडमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. त्यानंतर आज (शनिवारी) मुक्ताबाई यांच्या पालखीसह दिंडीचे पाहिले उभे रिंगण सुभाष रोडवर संपन्न झाले. ही पालखी महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतरावरुन येणारी पालखी असून यात मोठ्या संखेने महिला भाविक सहभागी झाल्या आहेत.
संत मुक्ताबाईंच्या पालखीचे पाहिले उभे रिंगण बीडमध्ये संपन्न - नामदेव
स्त्री संताच्या नेतृत्वाचे दर्शन घडवणारी 350 वर्षांची अखंड परंपरा जोपासणाऱ्या मुक्ताबाईच्या दिंडीचे शनिवारी बीडमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. आज शनिवारी मुक्ताबाई यांच्या पालखीसह दिंडीचे पाहिले उभे रिंगण सुभाष रोडवर संपन्न झाले. ही पालखी महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतरावरुन येणारी पालखी असून यात मोठ्या संखेने महिला भाविक सहभागी झाल्या आहेत.
![संत मुक्ताबाईंच्या पालखीचे पाहिले उभे रिंगण बीडमध्ये संपन्न](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3701301-thumbnail-3x2-pa.jpg)
आज शनिवारी निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम, या संत मालिकेतील आद्य महिला संत मुक्ताबाई यांच्या पालखीसह दिंडीचे पाहिले उभे रिंगण सुभाष रोडवर संपन्न झाले. आजचा मुक्कम शहरातील माळीवेस हनुमान मंदिरात आहे. सर्व संताची भगिणी आणि चांग देवाची गुरु असलेल्या मुक्ताईची पालखी गेल्या साडे तीनशे वर्षापासुनची परंपरा अखंड चालवत आहे. ही पालखी वारकरी सांप्रदायात स्त्री संताच्या नेतृत्वाचे दर्शन घडवनारी आहे. या पालखी सोहळ्यात हजारो महिला भाविक सहभागी झालेल्या आहेत.
आदि शक्ति मुक्ताबाईची पालखी मुक्ताईनगर, जिल्हा जळगाववरुन पंढरपुरकडे मार्गक्रम करताना पालखी, घोडे, चोपदार, सर्व लवाजम्यासह ७५० किलोमीटरचा प्रवास करुन दशमीच्या दिवसी पंढरपुरमध्ये पोहचते. या पालखीचा पंढरपुरमध्ये मोठा मान आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त अंतरावरुन येणारी पालखी असुन यात मोठ्या संखेने महिला भाविक सहभागी झाल्या आहेत.