बीड -परतीच्या पावसाचा मोठा फटका ( return rain gave a heavy blow ) शेतकऱ्यांना बसला असून सोयाबीनसह अन्य पिकांची प्रचंड नासाडी झाली ( Loss of farmers due to return rains ) आहे. संकटात शेतकऱ्यांना ( Farmers in trouble due to rain ) सावरण्यासाठी राज्य सरकारने नुकसानीचे सरसकट पंचनामे ( Panchnama of loss of farmers) करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे ( BJP National Secretary Pankaja Munde ) यांनी केली आहे. मांजरसुंबा तालुक्यातील जाधववाडी शिवारात नुकसानग्रस्त शेती पिकांची आज पाहणी करून पंकजा मुंडे ( Pankaja Munde inspects the damaged areas ) यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले.
जिल्हयात झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या शेतातील पिकांची अक्षरशः माती झाली आहे, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. अशा संकटात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आज मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावरील जाधववाडी शिवारात शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. पावसामुळे शेतात अक्षरशः पाण्याचे तळे साचले असून पिके पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे विदारक चित्र त्यांना पहावयास मिळाले. यावेळी नुकसानीची माहिती त्यांनी तहसीलदारांकडून जाणून घेतली.