महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मृत्यू पावलेल्या बीडच्या 'त्या' दोन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह - Two died in beed

गेवराई येथील मोहम्मद रफीक हे डेंग्यूची लागण झाली म्हणून जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. तर उषा वैद्य या हृदयविकाराने पीडित होत्या.

Beed corona
मृत्यू पावलेल्या बीडच्या 'त्या' दोन्ही रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह

By

Published : Jul 10, 2020, 7:20 AM IST

बीड - जिल्हा रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून उपचारासाठी दाखल झालेल्या दोन रुग्णांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेतल्यानंतर काही तासांतच त्यांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी रात्री उशिरा त्या दोघांचेही कोरोना अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले. मोहम्मद अब्दुल रफिक (रा. मोमिनपुरा, गेवराई वय 62) आणि उषा वैद्य (पांगरी रोड, बीड वय- 56) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

गेवराई येथील मोहम्मद रफीक हे डेंग्यूची लागण झाली म्हणून जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झाले होते. तर उषा वैद्य या हृदयविकाराने पीडित होत्या. हे दोन्ही रुग्ण बुधवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. अखेर गुरुवारी दोन्ही रुग्णांचा कोरोना चाचणीसाठी नमुने घेतल्यानंतर मृत्यू झाला. दोघांचेही कोरोना अहवाल निगेटीव्ह असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details