महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड खून प्रकरण : गुडांना अटक करा, अन्यथा स्वत:ला संपवू; मृताच्या नातेवाईकाचा आत्मदहनाचा प्रयत्न - beed Crime News

बीडमध्ये साजिद अली सय्यद यांचा गुरुवारी खून झाला. या प्रकरणी मृताच्या नातेवाईकांनी गुडांना अटक करण्याची मागणी केली.

बीड खून प्रकरण

By

Published : Sep 20, 2019, 3:27 PM IST

Updated : Sep 20, 2019, 3:48 PM IST

बीड -मागील चार वर्षांपासून सातत्याने पोलिसांना संरक्षण मागूनही संरक्षण मिळाले नाही. याचा परिणाम अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सहशिक्षक सय्यद साजिद आलि यांचा गुरुवारी खून झाला. जोपर्यंत बीड पोलीस मोमिनपुरा भागातील गुंडांना पकडणार नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, अशी मागणी करत मृताच्या नातेवाईकांनी चक्क पोलीस अधीक्षक कार्यालयात शुक्रवारी दुपारी 12च्या सुमारास अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने कौसर यांचा जीव वाचला.

बीड खून प्रकरण

साजिद अली सय्यद असे खून झालेल्या सहा शिक्षकांचे नाव आहे. मागील चार वर्षापासून साजिद अली सय्यद हे बीड पोलिसांकडे स्वतःला संरक्षण द्या म्हणून चकरा मारत होते. मात्र, त्यांची बीड पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे त्यांचा गुरुवारी मोमिनपुरा भागातील काही गुंडांनी खून केला. संपूर्ण मोमीनपुरा भागात सध्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने महिलांसह लहान मुले दहशतीखाली आहेत.

खून झालेल्या सय्यद अली यांच्या नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विशेष लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. खून होऊन 25 तास उलटले तरीही या प्रकरणातील मास्टरमाइंड गुज्जर खान पोलिसांना सापडलेला नाही. गुज्जर खान याच्यावर मोठ्याप्रमाणात गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात होता.

Last Updated : Sep 20, 2019, 3:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details