महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये विवाहितेची हत्या झाल्याचा नातेवाईकांचा आरोप, गेवराई ठाण्यात गुन्हा दाखल - विवाहितेची हत्या

बीडमध्ये एका 25 वर्षीय विवाहित महिलेला विष देऊन मारले, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या मृत महिलेच्या सासरच्या मंडळींंविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठिय्या मांडला. ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्यात घडली.

बीड
बीड

By

Published : Jun 26, 2021, 11:01 AM IST

Updated : Jun 26, 2021, 2:39 PM IST

बीड- एका 25 वर्षीय विवाहित महिलेला विष देऊन मारले, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच या मृत महिलेच्या सासरच्या मंडळींंविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठिय्या मांडला. ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्यात घडली. शुक्रवारी रात्री 11 वाजता गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी मृतदेह ठाण्यात आणल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे. कांचन विशाल राठोड (वय 25 वर्ष रा. गेवराई) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, पाच वर्षांपूर्वी कांचन तिचा विवाह गेवराई येथील विशाल राठोड याच्या सोबत झाला होता. सुरुवातीच्या काळात सगळं व्यवस्थित होतं. मात्र मागील दोन वर्षापासून कांचन व तिच्या सासरच्या मंडळींमध्ये घरगुती वाद होते. या वादातून 10 जून रोजी कांचन हिला विशालसह त्याचे वडील, आई व विशालच्या भावाने विष पाजले होते, असा आरोप माहेरच्या मंडळीने केला आहे. या दरम्यान तिला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान कांचनची प्रकृती चिंताजनक झाली व अखेर शुक्रवारी रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या मृत्यूला सासरकडील मंडळी कारणीभूत आहेत. असे म्हणत कांचनच्या नातेवाईकांनी तिचा मृतदेह गेवराई पोलीस ठाण्यात आणून ठेवला व गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आग्रह धरला होता. नातेवाइकांनी ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर गेवराई पोलिसांनी रात्री साडे बारा वाजताच्या नंतर गुन्हा दाखल केला.

औरंगाबाद रुग्णालयातून पती फरार-

औरंगाबाद येथील रुग्णालयात कांचन तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा पती, सासरा व दीर फरार झाले शुक्रवारी मध्यरात्रीनंतर गेवराई पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. आरोपींच्या शोधासाठी पथक तयार करून शोध सुरू असल्याची माहिती गेवराई पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मनीषा जोगदंड यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. दरम्यान, तिच्या माहेरच्या मंडळीशी संपर्क होऊ शकला नाही.

Last Updated : Jun 26, 2021, 2:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details