महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

RDX Blast Threat : परळी येथील प्रभू वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची धमकी; पोलिसांचा चोख बंदोबस्त - परळी पोलीस स्टेशन

प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बॉम्ब लावून उडवून देऊ अशी धमकी मिळाल्याने परळी शहरात एकच खळबळ माजली आहे. शुक्रवार दि 26 रोजी वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त यांच्या नावाने आलेल्या या धमकीने पोलीस प्रशासन हाय अलर्टवर असून मंदिर व परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Parali police stattion
परळी पोलीस स्टेशन

By

Published : Nov 27, 2021, 9:32 AM IST

बीड- 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे मंदिर ( Prabhu Vaidyanath temple in Parli ) बॉम्ब लावून उडवून देऊ ( Blast Threat ) अशी धमकी मिळाल्याने परळी शहरात ( Parali) एकच खळबळ माजली आहे. शुक्रवार दि 26 रोजी वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त यांच्या नावाने आलेल्या या धमकीने पोलीस प्रशासन हाय अलर्टवर ( Police Administration On High Alert ) असून मंदिर व परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

50 लाखांची मागणी -

12 ज्योतिर्लिंगापैकी 5 व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग ( Jyotirlinga ) असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त यांना आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी, अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन ( RDX Blast Threat ), अशी धमकी असलेल्या कथित ड्रग माफियाने ( Drug Mafia ) पत्राद्वारे दिली. यामुळे संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक प्रभू वैद्यनाथाचे मंदिर परळी येथे आहे. या मंदिराच्या दर्शनासाठी राज्य व पर राज्यातून भाविक येतात.

पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली -

मार्च २०२० पासून हे मंदिर कोविडमुळे बंद ठेवण्यात आले होते. महिनाभरापूर्वी मंदिरे उघडण्याचा निर्णय झाल्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले. यामुळे भाविकांची गर्दी आहे. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्काच बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा. काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड या पत्त्यावरुन हे पत्र आले असून सदरील पत्र शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून मंदिर व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details