महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Rakshasbhuvan Shani Temple : राक्षसभुवनचा शनी करतो लोकांची साडेसाती दूर; जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्ये - Rakshasabhuvan Shani

बीड जिल्ह्यातील राक्षसभुवन येथे शनीचे मंदिर आहे आणि हे मंदिर देशातील साडेतीन पीठापैकी एक पूर्ण पीठ म्हणून ओळखले जाते. विशेष म्हणजे, ज्या लोकांना साडेसाती आहे अशा लोकांची साडेसाती या ठिकाणी शनी दर्शनाने कमी होत असल्याचे लोक सांगत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी जे व्यक्ती मरण पावतात त्या व्यक्तीचे दशक्रिया विधीचे कार्यक्रमही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केला जातो त्याचबरोबर शनी अमावस्याला मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. याविषयीचा ईटीव्ही भारत चा एक स्पेशल रिपोर्ट...

Rakshasbhuvan Shani
बीड जिल्ह्यातील शनी महाराज

By

Published : Mar 3, 2023, 10:20 PM IST

Updated : Mar 4, 2023, 6:26 AM IST

शनी महाराजांविषयी सांगताना भाविक

बीड: याबाबत आख्यायिका अशी की, फार पूर्वीच्या काळी प्रल्हाद आणि राता हे हिरण्यकश्यपूची दोन मुले होती. राताची दोन मुले वातापी आणि इलवल होती. पूर्वी काळी हे दंडकारण्य होते आणि या दंडकारण्यामध्ये राक्षसांचा संचार होता. याचे खरे नाव आनंद भुवन आहे. निजाम काळाच्या स्टेटमध्ये याचे रक्षेभुवनचे राक्षसभुवन नाव पडले. दुसरी गोष्ट अशी आहे की वातापी आणि इलवल दोघेजण दंड प्रदक्षणा करणाऱ्या लोकांना ज्या वेळेस ते या ठिकाणी यायचे इथे येणाऱ्या लोकांना ते आग्रह करून थांबवायचे. ते त्यांच्या पोटामध्ये शिरून राक्षस रुपी अन्नग्रहण करायचे. ग्रहण केल्यानंतर दुसरा भाऊ त्याला बाहेर बोलवायचा की, वातापी आता बाहेर ये आणि त्यावेळेस वातापी मेंढ्याचा रूपधारण करून शिंगाने पोट फाडून बाहेर यायचा आणि त्याचं नरभंश दोघांनी भक्षण करायचे. असा त्यांचा नित्यक्रम चालू असताना इकडे येणारे भाविक लोक फार कमी झाले. जालना जिल्ह्यातील साष्ट पिंपळगाव येथे अगस्ती ऋषींचा आश्रम होता आणि या दृष्ट राक्षसांची नजर त्यांच्यावर पडली. त्यामधील एक एक ऋषी आणायचा मारायचा आणि खायचा हा त्यांचा नित्यक्रम त्यांनी चालू केला. ज्यावेळेस अगस्ती ऋषींनी आपल्या शिष्यांना विचारले की, या ठिकाणी काय चालू आहे? त्यांनी सांगितले की, पलीकडच्या काठावरून एक ब्राह्मण येतो आणि आपल्या ऋषींना घेऊन जातो. पण ऋषी काही परत येत नाहीत. मग अगस्ती ऋषींनी अंतर चक्षुणी पाहिले काय प्रकार आहे तो त्यांना कळला. त्यांनी शनीची आराधना केली, वातापी आणि इलवल यांच्या वृषभ राशी शनि कोणत्या स्थानात असेल जन्म कुंडलीमध्ये अष्टमास्थानामध्ये जेव्हा शनी येतो त्यावेळेस त्याला मृत्यू स्थान म्हणतात.

ही आहे शनीची आख्यायिका: साडेसातीपेक्षा हे स्थान अवघड आहे. मग त्या अगस्त्य ऋषींनी सांगितलं की उद्या जो ब्राह्मण येईल त्याला माझ्याकडे पाठवा. मग हे‌ वातापी ब्राह्मण बनवून त्या ठिकाणी गेला आणि गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या ऋषींनी त्याला अगस्ती ऋषीकडे घेऊन गेला व सांगितलं की, आपण आजच्या दिवस या ठिकाणी मुक्काम करावे आणि आमचे भोजन करावे, असा त्यांनी आग्रह धरला. या शनि मंदिराच्या वरती जे पिंपळाचे झाड आहे त्या झाडाखाली अस्वस्थामा असे म्हणतात आणि या झाडाखाली बसून गायत्री मंत्र म्हणून प्रक्षण करून ते अन्न शुद्ध केले. पोटामध्ये वडवाग्न नावाचा अग्नि तयार केला मी प्राणाय स्वाहा विहाणाय स्वाहा विदानाय स्वाहा प्राणायान स्वाहा ब्रह्मायन नमः म्हणून असे पाच घासांमध्ये ब्राह्मण पोटामध्ये टाकला. ज्यावेळेस दुसऱ्या भावाच्या लक्षात आले हा भाऊ बरेच दिवस झाले माझ्याकडे येत नाही. त्यांच्या लक्षात आले व त्यांनी इथून पळायला सुरुवात केली. तो राक्षस थेट समुद्रामध्ये जाऊन लपला आणि अगस्ती ऋषी त्याच्या पाठीमागे गेले व अगस्ती ऋषींनी समुद्राला प्रार्थना केली की हे समुद्रा, तुझ्या पोटातील राक्षस मला परत दे. परंतु समुद्रालाही गर्व झाला की तुझ्या हिम्मत असेल तर तू तुझा राक्षस शोध. मग अगस्ती ऋषींनी पूर्ण समुद्र प्राशन केला आणि त्याच्यामध्ये जो राक्षस लपला होता त्याला शोधून काढले. त्या ठिकाणी त्या दुसऱ्या राक्षसांचा ही वध केला. इथे राक्षस भुवनला येऊन वालोकामय शनि गुरु आणि रवी, राहु, केतु, मंगळ, बुध, शुक्र अशा सात ग्रहांची स्थापना केली आणि शनीची जी मधली मूर्ती आहे, व दुसरी श्री आकाराची जी मूर्ती आहे ती वेला आहे तर डाव्या हाताला काळ आहे. ज्यावेळेस माणसाला साडेसाती येते त्यावेळेस काळ आणि वेळ जर बरोबर आला तरच त्यांनी हा त्रास देऊ शकतो.


रामायणतही या कथेचे वर्णन: गोष्ट अशी आहे की प्रभू रामचंद्राला ज्यावेळेस साडेसाती आली त्यावेळेस वशिष्ठ ऋषींनी सांगितले की दंडक अरण्यामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारच्या मूर्ती त्या ठिकाणी दिसतील. प्रभु रामचंद्राला साडेसाती होती त्यांनी वनवासामध्ये शनीची स्थापना आणि पूजा केली. राम-लक्ष्मण आणि सीता या रूपातही शनीचे दर्शन आहे. ही कथा रामायणामध्ये सुद्धा आपल्याला वाचायला मिळेल.



काय म्हणतात भाविक भक्त:महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये असलेल्या साडेतीन पिठापैकी पूर्णपीठ म्हणून शनीला ओळखले जाते. गेवराई तालुक्यातील शनी मंदिर आहे आणि अनेक दिवसापासून या ठिकाणी आम्ही दर्शनाला येत असतो. शनी महाराजांना उडीद मूग, तेल व मीठ फुल रूटीचे पान वाहतात आणि साडेसाती दूर व्हावी याच्यासाठी या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येत असतात.

हेही वाचा:Palghar Crime : धक्कादायक! दहा वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Last Updated : Mar 4, 2023, 6:26 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details