बीड - राज्यात सध्या भाजपच्या संघटनात्मक निवडणुका सुरु आहेत. यामध्ये बीड जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूकही अनेक दिवसापासून रखडली होती. अखेर बीडच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत ही निवड करण्यात आली.
बीडमध्ये भाजपची खांदेपालट, जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मस्केंची नियुक्ती - BJP leader Rajendra Maske
राज्यात सध्या भाजपच्या संघटनात्मक निवडणुका सुरु आहेत. यामध्ये बीड जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूकही अनेक दिवसापासून रखडली होती. अखेर बीडच्या भाजप जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र मस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्यावर विश्वास ठेवून जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मस्के यांनी त्यांचे आभार मानले. जिल्ह्यात प्रभावी विरोधीपक्ष म्हणून सामान्यांचे प्रश्न मांडण्याचा आणि संघटन बळकट करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे मस्के यावेळी म्हणाले.
राज्यात सध्या भाजपच्या संघटनात्मक निवडणुका सुरु असून, बीडची निवड अनेक दिवसांपासून रखडली होती. २ दिवसापूर्वी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या होत्या. शुक्रवारी बीड जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपची बैठक झाली. यात भाजपकडून राजेंद्र मस्के आणि नवनाथ शिराळे या दोघांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, नंतर नवनाथ शिराळे यांनी माघार घेतली आणि राजेंद्र मस्के यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी निवडणूक अधिकारी माजी मंत्री सुभाष देशमुख, खा. डॉ. प्रीतम मुंडे यांच्यासह आमदार सुरेश धस, मावळते जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे सदस्य उपस्थित होते.