महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीडमध्ये कोसळल्या अवकाळी पावसाच्या सरी; वातावरणात गारवा, पिकांचे नुकसान - rain in beed

शहर परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.

rain in beed
शहर परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.

By

Published : Mar 30, 2020, 9:40 PM IST

बीड - शहर परिसरात सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.

जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. अचानक सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच पावसामुळे शहरातील काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे पोलिसांची मात्र तारांबळ उडाली होती.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वातावरणात होणारा बदल चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. वातावरणात अधिक तापमान राहिल्यास कोरोनाशी लढणे सोपे जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details