बीड- शहरातील एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असलेला जुगार अड्ड्यावर बीड पोलिसांनी शनिवारी (दि. 18 जुलै) रात्री उशिरा छापा टाकला यामध्ये 28 जणांना ताब्यात घेतले असून सुमारे साडेपाच लाखांची रक्कम जप्त केली आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या पथकाने बीड शहरातील एका बड्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त असलेल्या व्यक्तीच्या जुगार अड्ड्यावर शनिवारी रात्री छापा मारला. मागील काही दिवसांमध्ये वाघा सारख्या डरकाळ्या फोडत अवैद्य धंदे चालवणार्याला या कारवाईमुळे चपराक बसली आहे. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी विशेष मोहीम आखली आहे. एका राजकीय पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्याचा वरदहस्त असल्यामुळे या जुगार अड्ड्यावर आतापर्यंत छापा पडला नव्हता. मात्र, पोलीस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकून मुद्देमालासह अठ्ठावीस जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती ठाणे प्रमुख गजानन जाधव यांनी दिली.
राजकीय वरदहस्त असलेल्या व्यक्तीच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 28 जण ताब्यात - beed police special team
बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने शहरातील एका जुगार अड्ड्यावर छापा मारला. यात सुमारे साडेपाच लाखांची रक्कम जप्त केली असून याप्रकरणी 28 जणांना ताब्यात घेतले आहे.
यांच्यावर झाले गुन्हे दाखल
सय्यद सलमान सय्यद खमर, जुगारअड्ड्यावरील व्यवस्थापक शिवराज शहाजी गायकवाड, नीलेश धनराज गायकवाड, सखाराम नानासाहेब शिंदे, बिभीषण तुकाराम जानकर, खिदर आय्युब मन्यार, जावेद गफूर शेख, शेख गुलामी शेख बशीर, शेख निसार शेख अनीस, गणेश लक्ष्मण गायकवाड, बाळू शिवाजी गायकवाड, ओमकार कैलास भेंडसुरे, शेख कलीम शेख सलीम, अफूज खान फिरोज खान, सय्यद फिरदोस सय्यद जाफर, दीपक कचरु सवई, सुमेर खान समद खान, आयुब खान मुजीब खान, विशाल किसन गाडे, नितीन अदिनाथ शिंदे, संकेत चंद्रकांत तागडे, शेख रईस शेख अनिस, शेख अनीस शेख अजीज, अमोल शिवनारायण तापडिया, अजहर खान जाफर खान, सय्यद सगीर सय्यद वजीर, बाळासाहेब नारायण शिंदे, शुभम हनुमान लोखंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.