महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुल रेखावार बीडचे नवे जिल्हाधिकारी - जिल्हाधिकारी राहुल रेखावार

दोन महिन्यांपासून रिक्त असलेल्या बीडच्या जिल्हाधिकारीपदी औरंगाबादच्या वीज वितरण कंपनीतील सह व्यवस्थापक संचालक राहुल रेखावरा यांची वर्णी लागली आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार

By

Published : Feb 5, 2020, 9:52 AM IST

बीड- मागील दोन महिन्यांपासून बीडचे जिल्हाधिकारी हे पद रिक्त होते. अखेर विद्युत वितरण कंपनीमध्ये सह व्यवस्थापक संचालक पदावर औरंगाबाद येथे कार्यरत असलेले राहुल रेखावार यांची बीड जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी पुणे येथून प्रियंका देशभ्रतार यांची बीड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र, त्यांनी येण्यासाठी नकार दिल्यानंतर हे पद जिल्हाधिकारी हे पद रिक्त होते. आता महावितरण विभागात कार्यरत असलेले राहुल रेखावार बीडचे नवे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत.

हेही वाचा - पीक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या 'बजाज इन्शुरन्स'वर अखेर गुन्हा दाखल

दोन महिन्यांपूर्वी आस्तिक कुमार पांडे यांची बीड जिल्हाधिकारी पदावरून औरंगाबाद येथे बदली झाल्यानंतर बीडला जिल्हाधिकारी म्हणून येण्यास अधिकारी तयार नव्हते. अखेर मंगळवारी (दि. 4 फेब्रुवारी) उशिरा राहुल रेखावार यांची बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून ऑर्डर निघाली आहे. पुढील दोन दिवसात राहुल रेखावार आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - बीडमध्ये घाटात ब्रेक फेल झाल्याने कंटेनरचा अपघात, चालक जागीच ठार

ABOUT THE AUTHOR

...view details