बीड:पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याचे धागेदोरे बीड जिल्ह्यातील मुंगी तालुका धारूर येथे असलेल्या शिवपार्वती कारखान्याला कोट्यवधी रुपयांची कर्ज दिले होते. सदर कारखान्याकडे तारणासाठी पुरेशी प्राॅपर्टी नव्हती. तरी हे कर्ज देण्यात आल्याचा आरोप असून त्या अनुषंगाने सीबीआयने बुधवारी आणि गुरुवारी दिवसभर कारखाना साइटवर छापेमारी करून माहिती घेतल्याचे समजत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?शिवपार्वती साखर कारखान्याची उभारणी पांडुरंग सोळुंके यांच्या पुढाकारातून करण्यात आली. यात इतरही काही भागीदार आणि संचालक होते. या कारखान्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने कर्ज दिले; मात्र त्यानंतरच्या काळात कारखाना सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे पंजाब नॅशनल बँक आणि कारखान्याच्या संचालकांनी देखील हा कारखाना विकण्याचा प्रयत्न केले होते. मराठवाड्यातील अनेक राजकीय पक्षांच्या लोकांनी यात कारखाना घेण्यास तयार होते. मात्र वेगवेगळ्या न्यायालय प्रक्रियेमुळे ही विक्री प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने या कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरू करण्याच्या आदेश दिले होते. याची पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होणार आहे. हे सारे होत असताना पंजाब नॅशनल बँकेने गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास सीबीआयकडे गेला आणि त्यातूनच छापेमारी सुरू झाल्याचे समोर येत आहे.