बीड- जिल्ह्यातील पिंपरगव्हाण येथे शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात जिवीताला धोका असल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांकडून वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही. हा पोलिसांचा अक्षम्य नाकर्तेपणा असल्याचे सांगत पोलीस अधिक्षकांनी बीड शहर पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकासह एका जमादारास निलंबित केले आहे.
बीड तिहेरी हत्याकांड : वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई न केल्याने फौजदारासह जमादार निलंबित - पोलीस
बीडमध्ये शेतीच्या वादातुन शनिवारी तीन सख्ख्या भावांची हत्या झाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात शुक्रवारीच (दि. २६) दोन्ही गटांनी बीड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या होत्या.
बीडमध्ये शेतीच्या वादातुन शनिवारी तीन सख्ख्या भावांची हत्या झाली होती. विशेष म्हणजे या प्रकरणात शुक्रवारीच (दि. २६) दोन्ही गटांनी बीड शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या होत्या. मात्र, शहर पोलिसांनी यात प्रतिबंधात्मक कारवाई केली नाही. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. प्रतिबंधक कारवाईतील हा अक्षम्य हलगर्जीपणा असल्याचे सांगत बीड शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक मनिषा जोगदंड आणि जमादार वंजारे यांना शनिवारी निलंबित करण्यात आले आहे.
शेतजमिनीच्या वादात वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही तर कठोर कारवाईस तयार रहा असा इशाराही पोलीस अधिक्षकांनी सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिला आहे.