बीड- परतीच्या पावसामुळे बीड शहरातील रस्ते उखडल्यामुळे रस्त्यांची स्थिती अधिक बिकट झाली आहे. रहदारी सुरळीत होण्याच्या दृष्टीने रस्त्याची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे आहे. यासाठी 3 कोटी निधीची मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन द्या; नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र - बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर
बीड शहरातील अनेक रस्त्यांवर अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक मुख्य रस्त्यांवर यामुळे रहदारीसाठी अडचण निर्माण झाली आहे.
![शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन द्या; नगराध्यक्षांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5080847-450-5080847-1573884769021.jpg)
हेही वाचा -प्रिन्स प्रकरण: महापालिका सभागृहात थर्ड पार्टी चौकशीची मागणी
बीड शहरातील अनेक रस्त्यांवर अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी खड्डे झाले आहेत. अनेक मुख्य रस्त्यांवर यामुळे रहदारीसाठी अडचण निर्माण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी व बीड शहरात पॅचवर्कचे काम हाती घेण्यासाठी 3 कोटी निधीची आवश्यकता असून जिल्हा वार्षिक योजना (धनिकेत्तर योजना) किंवा अतिवृष्टी संबंधी विशेष निधी अंतर्गत मंजूर करावा, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी शुक्रवारी बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूची पाहणी करून जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.