बीड - केवळ दीड एकर क्षेत्रावर केलेल्या टोमॅटो लागवडमधून तब्बल सहा लाख रुपयांचे उत्पादन तेही केवळ दीड महिन्यात घेण्याची किमया बीडच्या एका अवलिया शेतकऱ्याने साधली आहे. त्यांच्या या यशोगाथेचा 'ईटीव्ही भारत'ने घेतलेला हा आढावा....
बीड तालुक्यातील बोरखेड या छोट्याशा गावातील शेतकरी भाऊसाहेब शिंदे यांनी टोमॅटो लागवडीमधून विक्रमी उत्पादन घेतले आहे. तेही विशेष म्हणजे अत्यल्प खर्च करून टोमॅटो उत्पादनाला चांगला भाव मिळेल याचे टाइमिंग देखील भाऊसाहेब शिंदे यांनी साधले आहे. बोरखेड येथे भाऊसाहेब शिंदे यांची शेती आहे. दोन ते अडीच महिन्यापूर्वी त्यांनी केवळ दीड एकर क्षेत्रावर टोमॅटोची बेड पद्धतीने लागवड केली. सुरुवातीला टोमॅटोच्या झाडांची योग्य ती फवारणी केली. इतर शेतकऱ्यांना प्रेरणादायी अशी विशेष बाब म्हणजे इतर केमिकल युक्त फवारण्या न करता घरच्या घरी बनवलेल्या वेगवेगळ्या वनस्पतीच्या मिश्रणाचा तसेच शेळीच्या खताचा वापर त्यांनी केलेला आहे. यामुळे दीड एकर टोमॅटोच्या उत्पादनासाठी लागणारा खर्च केवळ 20 ते 25 हजार रुपये एवढा अल्प असल्याचे भाऊसाहेब शिंदे मोठ्या अभिमानाने सांगतात.
अडीच महिन्यात दीड हजार कॅरेट टोमॅटो-