बीड - प्रीतम मुंडे यांच्या खासदार फंडावरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आमदार सुरेश धस अनुत्तरीत झाले. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारीची माहिती देण्यासाठी आज बीड भाजपने पत्रकार परिषद घेतली. गेल्या ५ वर्षात प्रीतम मुंडे यांनी फक्त ३० टक्के खासदार फंड खर्च केला आहे. यावरूनच आज पत्रकारांनी आमदारांना धारेवर धरले.
प्रीतम मुंडेंच्या खासदार फंड खर्चावरील प्रश्नावर आमदार सुरेश धस अनुत्तरीत - खासदार फंड
गेल्या ५ वर्षातील २५ लाख रुपयांच्या खासदार फंडापैकी फक्त १२.३० कोटी निधी निर्गमित केला. केवळ साडेसात कोटी रुपये खर्च वितरित झालेला आहे. उर्वरित खासदार फंड परत गेला. आता बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यामुळे खासदार फंडाच्या खर्चावरून विरोधक मुंडे यांना घेरण्याची शक्यता आहे.
गेल्या ५ वर्षातील २५ कोटी रुपयांच्या खासदार फंडापैकी फक्त १२.३० कोटी निधी निर्गमित केला. केवळ साडेसात कोटी रुपये खर्च वितरित झालेला आहे. उर्वरित खासदार फंड परत गेला. आता बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे बीड लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्यामुळे खासदार फंडाच्या खर्चावरून विरोधक मुंडे यांना घेरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात भाजपकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झाली आहे. बूथनिहाय आढावा देखील घेतला असून येणाऱ्या निवडणुकीला मोठ्या आत्मविश्वासाने सामोरे जात असल्याचे बीड भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी यावेळी सांगितले.