महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MODI Cabinet Expansion : डॉ. प्रीतम मुंडे यांची वर्णी लागण्याची शक्यता.. जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास - https://www.lokmat.com/politics/modi-cabinet-reshuffle-will-be-total-6-ministerial-posts-including-3-women-maharashtra-a629/

केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज संध्याकाळी ६ वाजता विस्तार होणार आहे. राष्ट्रपती भवनात नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अद्यापही मंत्र्यांच्या नावाची यादी अधिकृतपणे घोषित करण्यात आली नाही. मात्र दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. ज्या नेत्यांच्या नावाची मंत्रिपदासाठी चर्चा होती अशांना दिल्लीत बोलावणं आलं होतं. नव्या मंत्रिमंडळात अनेक तरूणांना संधी देण्यात आली आहे.

munde
munde

By

Published : Jul 7, 2021, 4:30 PM IST

बीड - राजकीय वारसा आणि वसा घेऊन काम करणाऱ्या बीडच्या खासदार डॉक्टर प्रीतम गोपीनाथराव मुंडे यांनी 2015 ला खासदार पदाची शपथ घेवून लोकसेवेचा वारसा चालू ठेवला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर बीडच्या खासदारपदाची धुरा कोण सांभाळणार ? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर प्रत्येकाने गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांच्या नावाचा आग्रह धरला.

डॉ. प्रितम मुंडे यांची थोडक्यात ओळख

डॉ. प्रितम मुंडे यांचा जन्म १७ फेब्रुवारी १९८३ मध्ये बीडमध्ये झाला. डॉ. प्रितम मुंडे सलग दुसऱ्या टर्ममध्ये बीडच्या खासदार आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या द्वितीय कन्या आहेत. तसेच पंकजा मुंडे यांच्या लहान बहीण आहेत. राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे त्यांचे चुलत बंधू आहेत. प्रीतम यांनी 2014 ची लोकसभा पोटनिवडणूक लढवली. ही निवडणूक त्या तब्बल सहा लाख 96 हजार 321 मतांच्या फरकाने जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांचा लीड कमी झाला. तरीही प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा एक लाख 68 हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. डॉ.प्रितम मुंडे यांचे सासरचे नाव प्रितम खाडे असे आहे.

परळी-बीड-नगर हा रेल्वे प्रकल्प मार्गी -

2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या दुसऱ्यांदा बीडच्या खासदार म्हणून निवडून आल्या. डॉ. प्रीतम मुंडे यांनी २०१० मध्ये डॉ. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. 2014 मध्ये स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे डॉक्टर प्रीतम मुंडे यांची राजकारणात एन्ट्री झाली. फेब्रुवारी 2015 मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या खासदार झाल्यावर त्यांनी अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये बीड जिल्हावासियांचा गेल्या 40 वर्षापासून रेंगाळत पडलेला परळी-बीड-नगर हा रेल्वे प्रकल्प करावा ही आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली.

रेल्वे प्रकल्पासाठी २८०० कोटींची तरतूद -

मोदी सरकारने गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच अर्थ संकल्पात एक हजार कोटींची भरीव तरतूद करून 2800 कोटीच्या या प्रकल्पास मान्यता देत हा प्रकल्प थेट पंतप्रधानांच्या देखरेखी खाली असेल असेही जाहीर केले. खासदार प्रीतम मुंडे यांनी रेल्वेचा बीडच्या जिव्हाळ्याचा प्रश्न केंद्रात मांडला होता. स्व. गोपीनाथरावजी मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये डॉक्टर प्रीतम मुंडे यांना बीडच्या खासदारकीसाठी निवडणूक लढवावी लागली. व त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या.

भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांच्या बहीण -

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या लहान बहीण व गोपीनाथ मुंडे यांची कन्या केवळ एवढीच डॉ. प्रीतम मुंडे यांची ओळख नाही तर त्यांनी स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी 2015 पासून असलेल्या खासदारकीचा पुरेपूर उपयोग केला आहे. खासदार प्रीतम मुंडे यांच्या खासदारकीची ही दुसरी टर्म आहे. शांत व संयमी राजकारणी म्हणून त्यांची राजकीय वर्तुळात विशेष ओळख आहे.

प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा लोकसभेत

डॉ. प्रीतम मुंडे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये दणदणीत विजय मिळवून खासदार म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णू जाधव हे निवडणूक रिंगणात होते. भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात प्रमुख लढत झाली. अखेर डॉ. प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर 1 लाख 78 हजार 920 मतांनी दणदणीत विजय मिळवला होता. राजकीय क्षेत्रासोबत प्रीतम मुंडे सामाजिक कामातही अग्रेसर असतात. गोपीनाथ मुंडे यांचं अपघातात निधन झाल्यानंतर पोटनिवडणुकीत प्रीतम मुंडे त्यांच्या जागेवर २०१४ मध्ये त्या निवडून आल्या होत्या.

७३ वर्षात बीडमधून तिघांना संधी -

मागच्या ७३ वर्षांच्या काळात केंद्रीय मंत्रीमंडळात यापूर्वी जिल्ह्यातील तिघांना संधी मिळालेली आहे. आता खासदार डॉ. प्रितम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. सर्वप्रथम नगर जिल्ह्याचे रहिवाशी पण बीड लोकसभा मतदार संघातून विजयी झालेले बबनराव ढाकणे यांच्या रुपाने जिल्ह्याला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रीपद भेटले. नंतर भाजपकडून विजयी झालेले जयसिंगराव गायकवाड यांनाही केंद्रात मनुष्यबळ विकास या महत्वाच्या खात्याची जबाबदारी मिळाली. २०१४ मध्ये दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना ग्रामविकास सारखे महत्वाचे खाते मिळाले. परंतु, शपथविधीनंतर काही दिवसातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details