महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पॅरोलवर असलेल्या कैद्याची गळफास घेऊन आत्नहत्या, गेवराई तालुक्यातील घटना - prisoner who on parole commits suicide

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याततील जातेगाव गावखोर तांडा येथे एका पॅरोलवर आलेल्या कायद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. पत्नीचा खून केल्यावरून त्याला शिक्षा झाली होती.

prisoner who on parole commits suicide
पॅरोलवर असलेल्या कैद्याची गळफास घेऊन आत्नहत्या

By

Published : Jul 27, 2020, 12:19 AM IST

बीड - जिल्ह्यातील गेवराई तालुक्याततील जातेगाव गावखोर तांडा येथे एका पॅरोलवर आलेल्या कायद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी समोर आली आहे. पत्नीचा खून केल्यावरून त्याला शिक्षा झाली होती. औरंगाबाद येथील हर्सूल जेलमध्ये तो शिक्षा भोगत होता, एक महिन्यापासून तो पॅरोलवर होता.

हेही वाचा -चालकाच्या कॅमेऱ्यात कैद झाला अपघाताचा थरार; पाहा व्हिडिओ..

ताराचंद पवार (26 रा. जातेगाव गावखोर तांडा) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, त्याला दोन दिवसात जेलमध्ये हजर व्हायचे होते. त्यापूर्वीच त्याने आत्महत्या केली आहे. पत्नीचा खून केल्याप्रकरणी त्याला शिक्षा झाल्याने हार्सुल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. तो एक महिन्यापूर्वी पॅरोलवर बाहेर आला होता. ही सुट्टी एक महिन्याची होती. त्याची मुदत दोन दिवसाने संपत असल्याने त्याला पुन्हा जेलमध्ये हजर व्हायचे होते. मात्र, त्याने रविवारी एका उंबराच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी तलवाडा पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. ठाण्याचे पीआय उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार खाडे हे पुढील तपास करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details