परळी (बीड) -महावितरणकडून मागणी बंद झाल्याने 18 फेब्रुवारी रोजी बंद पडलेल्या परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक 6 बंद करण्यात आले होते. परंतु आता नऊ दिवसांनंतर आजपासून वीजनिर्मितीला सुरुवात झाली आहे.
रविवारपर्यंत तिन्ही संच सुरू राहणार -
राज्यात विजेच्या मागणीप्रमाणे परळीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून वीजनिर्मिती करण्यात येते. परळीच्या संच क्रमांक 6,7 व 8 मधून विजनिर्मिती सुरळीत होत असताना 18 फेब्रुवारी रोजी मागणी नसल्याने तिन्ही संचातून होणारी विजनिर्मीती थांबवावी लागली होती. मात्र, नऊ दिवसांनंतर संच क्रमांक 8 मधून शनिवारपासून विजनिर्मीती सुरु झाली असून शनिवारी सायंकाळपर्यंत 19 मेगा वॅट वीजनिर्मिती करण्यात आली. परळी औष्णिक वीजकेंद्रात वीजनिर्मितीसाठी कोळसा व पाणी मुबलक उपलब्ध आहे. सध्या एका संचातून वीजनिर्मीती होत असून रविवारपर्यंत तिन्ही संच सुरू राहणार असल्याचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी सांगितले.
हेही वाचा - राज्यात सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 8 हजारांहून अधिक; शनिवारी 51 रुग्णांचा मृत्यू