गेवराई विधानसभा; अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
काही महिन्यावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. बीड जिल्ह्यात फोडाफोडीचे राजकारण वेग घेत आहे.
बीड- काही महिन्यावर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. बीड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. बीड जिल्ह्यात फोडाफोडीचे राजकारण वेग घेत आहे. विधानसभा मतदारसंघातील खळेगाव येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आदित्य ठाकरे गेवराईत शेतकरी संवाद यात्रा निमित्त येऊन गेले. त्या नंतर गेवराई विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला खिंडार पडले आहे.
गेवराई विधानसभा मतदार संघात भाजप आणि शिवसेना पक्षाला मोठ्या प्रमाणावर गळती लागली आहे. पक्षाच्या नेत्यांच्या कारभाराला कंटाळुन खळेगांव येथील शिवसेना फुटली आहे. शिवसेनेचे समर्थक फक्कड शिंदे यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन गेवराई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला.
गेवराई तालुक्यात सध्या भाजप आणि शिवसेनेला गळती लागली असुन रोजच विविध गावचे कार्यकर्ते आपल्या नेतृत्वाच्या कारभाराला कंटाळुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु असुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आ.अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश करत आहेत. मंगळवार दि. 6 ऑगस्ट रोजी गेवराई तालुक्यातील खळेगांव येथील शिवसेनेचे कट्टर समर्थक फक्कड शिंदे, कल्याण शिंदे, श्रीमंत शिंदे, हरिभाऊ महानोर, कल्याण बहीर यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे राष्ट्रवादीत स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांच्यासह खुशाल आहेर, परमेश्वर आमटे, शेख आलमभाई, अविनाश भोसले, सचिन आहेर, युवाराज आहेर, बंडु आहेर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.