बीड -जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रूडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका घरातून 5 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.
बीडमध्ये पाच लाखांचा गुटखा जप्त, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई - Gutkha was seized in Beed
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील दिंद्रूडमध्ये स्थानिक गुन्हे साखेने पाच लाखाचा गुटखा जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड येथे एका घरात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेल्या गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक भारत राऊत यांनी मिळाली होती. त्याच्या आदेशावरुन सहायक पोलिस निरीक्षक विजय गोसावी, कर्मचारी बालाजी दराडे, भास्कर केंद्रे, रामदास तांदळे, विकास वाघमारे, सखाराम पवार, संजय जायभाये, गोविंद काळे, सिद्दीकी यांनी दिंद्रुडमध्ये छापा टाकला. या छाप्यात शेख समशेर शेख अल्लहबक्ष याच्या घरात साडेचार लाख रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. पथकाने त्याला ताब्यात घेऊन दिंद्रूड पोलिसांच्या तब्यात दिले.