बीड- बनावट दारू बाजारामध्ये देशी दारूचे लेबल लावून विक्री करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी बुधवारी छापा टाकला. यात ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे. बीड तालुक्यातील शिरस पारगाव येथे बीड पोलिसांनी बुधवारी दुपारी ही कारवाई केली.
अवैध देशी दारू बनविणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा; ५ जण ताब्यात - desi daaru
बनावट दारू बाजारामध्ये देशी दारूचे लेबल लावून विक्री करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी बुधवारी छापा टाकला.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहितीनुसार, बीड पासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर सिरस पारगाव हे गाव आहे. तेथे बनावट दारू बनविण्याचा कारखाना असल्याची माहिती खबर्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी एक पथक नियुक्त करून सिरस पारगाव येथील दारूच्या बनावट दारू कारखान्यावर छापा टाकला. या छाप्यात देशी दारूचे लेबल तसेच बाटलीची टोपणे आदी साहित्यासह बाटल्या सील करण्याची मशीन, स्कार्पिओ गाडी पोलिसांना सापडली. हा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून अनेक वेगवेगळ्या प्रकारचे रसायन देखील येथे आढळून आले असल्याची माहिती पथकाचे प्रमुख रामकृष्ण सागडे यांनी दिली.
सुशील बबन शिंदे, सय्यद लतीफ सय्यद हमीद, गणेश राधाकिसन उगले, सुमंत वशिष्ठ नवले आणि सोनू शेषराव पवार या पाच आरोपींना पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरू आहे.