महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दारावती तांडा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा, 32 हजार रुपयांचा माल नष्ट - Liquor seized in parali

पोलिसांची गाडी पाहताच हातभट्टी चालक तेथून पळून गेले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक केली आहे.

दारावती तांडा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा
दारावती तांडा येथे अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा

By

Published : Apr 30, 2021, 12:58 PM IST

परळी वैजनाथ - परळी तालुक्यातील दारावती तांडा येथे परळी ग्रामीण पोलिसांनी बुधवार दि.28 एप्रिल रोजी अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 32 हजार रुपयांचे दारू व रसायन नष्ट केले आहे.

परळी तालुक्यातील दारावती तांडा येथे अवैध गावठी दारू निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहतीनुसार परळी ग्रामीणचे पोलीस निरीक्षक शिवलाल पूर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिसांच्या एका पथकाने बुधवारी सकाळी अचानक छापा मारला. या छाप्यात बत्तीस हजार रुपये किमतीचे दारू व रसायन नष्ट केले.

परळी ग्रामीण पोलिसांची गाडी पाहताच हातभट्टी चालक तेथून पळून गेले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवलाल पूर्भे, व तुकाराम बोडके, केकान, श्री मंगले स्वामी, घुगे, डोरलिकर यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details