महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बदलीचा निरोप समारंभ आटोपून परतणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू - police constable car accident

एका दिवसापुर्वीच या कर्मचाऱ्याची बदली झाली होती. आधीच्या पोलीस ठाण्यातून निरोप समारंभ आटोपून परतत असताना ही घटना घडली आहे. चारचाकीवरील ताबा सुटल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; बीडमधील खजाना विहिरीजवळील घटना

चारचाकी
चारचाकी

By

Published : Sep 13, 2020, 3:22 AM IST

बीड - तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे येथून बीडकडे येत असताना खजाना विहीरजवळ चारचाकीवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आदळली. यामुळे झालेल्या अपघातात पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री बारा वाजता घडली.

महेश अधटराव असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, महेश अधटराव हे नेकनूर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. 1 दिवसापूर्वीच त्यांची नेकनुर येथून गेवराई येथे बदली झाली होती. शनिवारी त्यांना नेकनुर पोलीस ठाणे येथून निरोप समारंभ देण्यात आला होता. निरोप समारंभाचा कार्यक्रम आवरून ते बीडकडे येत असताना बीड जवळील खजाना विहिरीजवळ आल्यानंतर त्याचा चारचाकीवरील (एमएच-23, एएस- 6004) ताबा सुटला आणि कार दुभाजकावर आदळली. यामुळे झालेल्या अपघातात महेश अधटराव गंभीर जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी बीड ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक सुजित बडे, पोह.जयसिंग वाघ आदींनी धाव घेतली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details