महाराष्ट्र

maharashtra

नात्यातीलच अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास जन्मठेप..!

By

Published : Feb 27, 2021, 4:05 PM IST

अंबाजोगाई तालुक्यातील शशिकांत बाळासाहेब चव्हाण याला दोषी ठरवून जन्मठेप आणि 31 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. अंबाजोगाई येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश माहेश्‍वरी पटवारी यांनी शुक्रवारी ही शिक्षा ठोठावली.

ambajogai beed rape case
अंबाजोगाई

अंबाजोगाई (बीड) - नात्यातील अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून तिच्या लहान भावास जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून अंबाजोगाई तालुक्यातील शशिकांत बाळासाहेब चव्हाण याला दोषी ठरवून जन्मठेप आणि 31 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. अंबाजोगाई येथील अपर जिल्हा व सत्र न्यायाधीश माहेश्‍वरी पटवारी यांनी शुक्रवारी ही शिक्षा ठोठावली.

घटना नोव्हेंबर २०१८ मध्ये घडली होती. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नात्यातीलच शशिकांत याने ती एकटी असल्याचे पाहून तिला ओढत शेतात नेवून बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास तुला आणि तुझ्या लहान भावाला ठार मारीन, अशी धमकी दिली. त्यानंतर पीडित मुलीला धमकी देऊन वारंवार अत्याचार केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात शशिकांत चव्हाण याच्याविरूद्ध कलम 376 (2)(आय.)(एन)(एफ) 323, 506, भा.द.वि.सह कलम 4,8,10, पोक्सो कायद्यातर्गंत गुन्हा नोंद करण्यात आला.

समाजकल्याण विभागाकडून मदत देण्याचे निर्देश

या प्रकरणाचा तपास बर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी करून आरोपी विरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे प्रकरण सुनावणीसाठी अंबाजोगाई येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर आले. सरकारी वकील अशोक कुलकर्णी यांनी आरोपीविरूद्धचे सबळ पुरावे सादर केले. या प्रक्रियेत सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी विरूद्धचे ठोस पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने शशिकांत बाळासाहेब चव्हाण यास दोषी ठरवून जन्मठेप व 31 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास कारावासाची शिक्षा तसेच सदरचा दंड हा पीडित मुलीस देण्यात यावा, असा आदेश दिला. तसेच समाजकल्याण विभागाच्या वतीनेही इतर मदत पीडितेस देण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. अशोक कुलकर्णी यांनी बाजू मांडली. त्यांना अ‍ॅड.एस.व्ही.मुंडे, अ‍ॅड.व्ही.एस.डांगे, अ‍ॅड.एन.एस.पुजदेकर, अ‍ॅड.पैरवी कदम यांनी सहकार्य केले.

गर्भपाताच्या गोळ्याही खाऊ घातल्या

बलात्कार केल्यानंतर पीडितेला गर्भधारणा होऊ नये, यासाठी गर्भपाताच्या गोळ्याही आरोपीने तिला खाऊ घातल्या. तरीदेखील वारंवार ठेवलेल्या संबंधामुळे पीडिता गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीतून स्पष्ट झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गुन्हा दाखल झाल्यांनतर एपीआय लक्ष्मण केंद्रे यांनी तातडीने आरोपीला जेरबंद केले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details