बीड -परळी शहरात विविध उपक्रमांतर्गत हिरिरिने भाग घेत शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान असणारे सर्व परिचित मुख्याध्यापक संतोष कराड यांचे निधन झाले आहे. मृत्यू समयी ते ४८ वर्षे वयाचे होते. त्यांच्या निधनाने परळीच्या शिक्षण क्षेत्रात शोकभावना व्यक्त होत आहेत.
संतोष कराड हे गेल्या अनेक वर्षांपासून परळीत शिक्षक म्हणून सेवेत होते. मूळचे चोपनवाडी येथील संतोष कराड हे परळी तालुक्यातील दाऊतपुर येथील पांडुरंग विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. परळी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले.