परळी (बीड) - लॉकडाऊनच्या काळात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर परळी शहरात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. परळी शहरातील आझाद चौक, गणपती मंदिर, शिवाजी चौक येथील नाकाबंदी दरम्यान केलेल्या कारवाईत रस्त्यावर फिरणारे वाहन चालक, विना मास्क फिरणारे नागरिक अशा जवळपास 1600 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 4 लाख 77 हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे.
दुकानदारांकडून 3 लाखांचा दंड वसूल
लॉकडाऊनमध्येही काही दुकानदारांनी दुकाने उघडली होती. त्यामुळे अशा दुकानदारांकडून नगर पालिकेने 3 लाख 12 हजार रुपये दंड वसूल केला आहे. दुकान उघडे असल्याची माहिती मिळताच परळी शहर पोलिसांचे फिरते पथक तेथे पोहोचते आणि कारवाई करते. या पथकात पोलीस व नगरपालिका कर्मचारी आहेत.