बीड - पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांनी भाजप नेतृत्वाची साथ सोडून राष्ट्रवादीची वाट धरली आहे.
बीडमध्ये पंकजा मुंडेंना धक्का; सावता परिषदेचे कल्याण आखाडे राष्ट्रवादीत - शरद पवार बीडमध्ये
पंकजा मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले सावता परिषदेचे संस्थापक कल्याण आखाडे यांनी भाजप नेतृत्वाची साथ सोडून राष्ट्रवादीची वाट धरली आहे. कल्याण आखाडे हे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे शनिवारी रात्री जिल्ह्यात मुक्कामी आहेत. यावेळी कल्याण आखाडे त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ऐन निवडणुकीत पंकजा मुंडे यांच्या गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे.
हेही वाचा -'दहा रुपयांत थाळी' ही संकल्पना राष्ट्रवादीची; एनसीपी शहराध्यक्षांनी लगावला उध्दव ठाकरेंना टोला
पंकजा मुंडे यांनी पक्षावर केलेली निष्ठा निष्फळ ठरली असून, आज गोपीनाथ मुंडे असते तर आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांवर ही वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया कल्याण आखाडे यांनी दिली.