बीड -मराठा समाजाच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल अंतर्मुख करणारा आहे. समाजातील तरूणांईसमोर आता भविष्यात प्रश्नचिन्ह आहे. आमचा प्रमाणिक 'नायक' कोण? आरक्षणाचा खरा 'टक्का' कोण सांगेल आणि देईल?, असा सवाल माझे मराठा समाज बांधव विचारत आहेत असे ट्विट भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले आहे.
मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करणारा - पंकजा मुंडे - beed latest news
मराठा आरक्षणाबाबात पंकजा मुंडेंनी ट्विट केले आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करणारा असल्याचे त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (SEBC) प्रवर्गांतर्गत दिलेले आरक्षण रद्द करण्याचा निकाल आज दिला. यावर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतर्मुख करतो, निकाल असा लागणारच नाही असे खरंच कोणाला वाटले होते का? मराठा समाजाचा संघर्ष मोर्चा, बैठका, आरोप -प्रत्यारोप आणि राजकारण याखाली दबून गेला आहे. झाले तर मी मी नाही तर तू तू ही आमच्या राजकारण्यांची भूमिका दुर्दैवी आहे. समाजाला अवास्तव शब्द दिले आणि समाजाची प्रतारणा झाली अशी भावना आहे. आता भविष्यात तरुणाई समोर प्रश्नचिन्ह आहे. आमचा प्रामाणिक “नायक” कोण? आरक्षणाचा खरा “टक्का” कोण सांगेल आणि देईल, हा प्रश्न माझे मराठा समाज बांधव विचारत आहेत, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.