बीड -काही जण म्हणतात जमीन माझ्या बापाची आहे. पण, मी म्हणते पक्ष माझ्या बापाचा आहे. गोपीनाथ मुंडेंनी मूठभर असलेला पक्ष जनसामान्यांपर्यंत नेला. आता मात्र, तो जनसामान्यांचा पक्ष मूठभर करू नका, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी राज्य नेतृत्वाला अप्रत्यक्ष टोला लगावला. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आज (१२ डिसेंबर) गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन केले, यावेळी त्या बोलत होत्या.
मी पक्षाला ७ जागा मागितल्या होत्या. मात्र, पक्षाने फक्त मला माझी जागा दिली. पक्ष ही प्रक्रिया आहे. पक्ष बदलत नाही. मात्र, माणसे बदलत असतात. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि तो आणखी वाढावा, यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. मात्र, यानंतर मी भाजपच्या कोअर कमिटीची सद्स्य राहणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
हे वाचलं का? - पक्ष माझ्या बापाचा, मी का सोडू? रक्तात बेईमानी नाही, पंकजा मुंडेंचे सुचक इशारे