बीड - मध्यप्रदेशातील एका हाॅस्पिटलमध्ये मराठी गरजू रूग्णाला बेड उपलब्ध झाला. आता त्या रूग्णाची प्रकृती सुधारत असून नातेवाईकांची चिंता दूर झाली आहे.
मराठी माणसाला मध्यप्रदेशातील हाॅस्पिटलमध्ये मिळाला बेड
ध्यप्रदेशातील एका हाॅस्पिटलमध्ये मराठी गरजू रूग्णाला बेड उपलब्ध झाला. आता त्या रूग्णाची प्रकृती सुधारत असून नातेवाईकांची चिंता दूर झाली आहे.
राहुल टेकाडे हे होश्यागाबादमध्ये (मध्यप्रदेश) गेल्या महिन्यापासून नोकरी निमित्त गेले होते. तिथे गेल्यावर त्यांचे आई-वडिल कोरोना पाॅझिटिव्ह आले. होश्यागाबाद नवीन शहर, कुणीच ओळखीचे नाही, त्यातच वडिलांचा ऑक्सिजन कमी होत चाललेला. कुठल्याच हॉस्पिटलला बेड मिळत नव्हता. हतबल झालेल्या राहुल यांनी त्यांचे मेहुणे अनंत कुलकर्णी यांना फोन करून सगळी परिस्थिती सांगितली. कुठलीही मदत मिळत नव्हती. कुलकर्णी यांनी काल (15 एप्रिल) रात्री माजलगावच्या उपनगराध्यक्षा सुमन मुंडे यांचे पुत्र दिपक मुंडे यांना सगळी परिस्थिती सांगितली. दिपक मुंडे यांनी लगेचच पंकजा यांना फोन केला. पंकजा मुंडे मध्यप्रदेश भाजपाच्या सहप्रभारी असल्यामुळे त्यानी लगेचच रात्री ११.३० वा. मध्यप्रदेशचे आरोग्य मंत्री विश्वास सारंग यांना फोन केला. त्यांच्या फोनमुळे सगळी यंत्रणा हालली. आरोग्य मंत्र्यांनी तेथील जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि काही वेळाने राहुल टेकाडे यांना तहसीलदारांचा फोन आला. त्यांचे वडिल नामदेव टेकाडे यांना मध्यरात्री १२ वाजता होश्यागाबाद येथील नर्मदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. आता राहुल यांच्या वडिलांची तब्येत सुधारत आहे.