बीड - माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. राजकारणात दीर्घकाळ आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या स्वराज यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करताना, महिला व बालकल्याण मंत्री तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर म्हटले की,
'फुल नही चिंगारी है ये भारत की नारी है' - पंकजा मुंडे - sushma swaraj
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनावर बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या.

'फुल नही चिंगारी है ये भारत की नारी है..
इस नारे को बदल कर
फुल भी है चिंगारी है ये भारत की नारी है...
करनेवाली हमारी फुल सी कोमला और चिंगारी सी तेजस्वी नेता आज हमें छोडकर चली गई..
तीव्र दुःख ओर वेदना का भाव है... शब्द नही मेरे पास ।।।
अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. सुषमा स्वराज यांच्याबरोबर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी सहकारी म्हणून अनेक वर्ष काम केले होते. त्यामुळेच पंकजा मुंडे व सुषमा स्वराज यांचे अत्यंत जवळचे संबंध होते.