महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pankaja Munde : आता मराठा आरक्षणानंतरच फेटा बांधणार, 2019 मध्ये आडवे आले त्यांना येत्या निवडणुकीत आडवे करू - पंकजा मुंडे - Pankaja Munde

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. आज बीड शहरात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी पंकजा मुंडे बोलत होत्या. 2024 हे वर्ष इतिहास घडवणार असल्याचेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde
Pankaja Munde

By

Published : Jun 30, 2023, 9:18 PM IST

पंकजा मुंडे यांचे भाषण

बीड :दूध पोळले आहे त्यामुळे ताक फुंकून प्यायचे आहे. 2024 ला इतिहास घडवायचा आहे, 2019 मध्ये जे विजयात आडवे आले त्यांना येत्या निवडणुकीत आडवे करू. 2024 मध्ये विजयी कौल मिळवण्यासाठी मी आता माझी भूमिका घेतली. पक्ष काय डिक्लेअर करेल ते करेल, पण माझी मी भूमिका घेतली. ती फायनल आहे असे, म्हणत पंकडा मुंडेंनी सूचक विधान केले आहे. पक्षाला त्या भूमिकेची सहमत करून घेणे हे माझे कर्तव्य आहे असे, देखील पंकजा मुंडे म्हणाल्या. आज बीड शहरात भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित बैलगाडा शर्यतीच्या उद्घाटन प्रसंगी मुंडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती होती.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे :पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त भागात जाऊन मोदींच्या यशस्वी 9 वर्षांची माहिती दिली. त्यावेळी मी सुरक्षा नाकारली. कारण त्या ठिकाणी मुंडे साहेबांची आठवण सांगणारे भेटले. या जिल्ह्यात आईची माया दाईला येत नसते. 2019 ला यशामध्ये आडवे येणाऱ्याला निवडणुकीत आडवे करु असे पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच आम्ही सरकारमध्ये असताना शेतकऱ्यांना अनुदान वेळेवर यायचे, यावर्षी चारशे कोटींची मागणी केल्यावर पदरात फक्त 192 कोटी मिळाले. त्यासंदर्भात देखील बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन प्रीतम ताई तुम्ही गरिबांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जाऊन भेटा अशा सूचना देखील पंकजा यांनी केल्या.



2024 ला ऐतिहासिक विजय मिळवायचा :वंचित पीडितांची कोणती जात नसते, ही मुंडे साहेबांची शिकवण आहे. माझ्या लोकांची कामे झालेली नाही. की माझ्या हृदयात दुखते. मराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधून घेणार नाही, फेटा घालून मिरवणार नाही. काही माध्यमांनी विचारले ताई तुम्ही आमदार नाही, खासदार नाही झालात, ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही, तरी एवढी चर्चा का. त्यावर सर्व समावेशक चेहरा पंकजा मुंडे झाल्या आहेत. अशी प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली. मी जी भूमिका घेतली ती घेतली. 2024 ला ऐतिहासिक विजय मिळवायचा. पक्ष जो निर्णय घेईल तो घेईल. राजकारणाच्या पटलावरून बीड जिल्हा बाजूला गेला नसेल. येणाऱ्या विजयाच्या शपथेमध्ये मला कोण कोण सहकार्य करणार असे त्या म्हणाल्या. तसेच मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या एकतेचा विजय असो अशी घोषणा देखील दिली.

हेही वाचा -वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर चेअरमनपदी पंकजा मुंडे

ABOUT THE AUTHOR

...view details