बीड: भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक अखेर बिनविरोध झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पंकजाताई मुंडेंसह बिनविरोध निवडून आलेल्या 21 संचालकांची नांवे आज जाहीर केली. यामध्ये, राजकारण न आणता कारखान्याचे हित डोळ्यासमोर ठेवून धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला व सकारात्मक पायंडा यातून पडेल असा विश्वास पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला.
21 संचालक बिनविरोध विजयी: राजकीय दृष्ट्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात मात्र काटे की टक्कर असल्याचे पाहायला मिळते. अनेक निवडणुका आपणही पाहिल्या आहेत. एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप झाल्याचे राजकीय वर्तुळात आपण पाहिले आहे. मात्र आज पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मिळून वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या 21 जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू होती. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने, उर्वरित 21 संचालक बिनविरोध विजयी झाल्याची घोषणा करण्यात आली.
बिनविरोध विजयी संचालक नावे
कारखान्याचं हितासाठी बिनविरोध निवडीचा निर्णय:लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मोठया कष्टातून आणि मेहनतीनं वैद्यनाथ साखर कारखाना उभा केला, पण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे कारखाना आर्थिक अडचणीतून जात आहे. आताच्या हया परिस्थितीत कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून त्याचे हित पाहणे महत्वाचे होते. म्हणून बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला. यातून चांगला व सकारात्मक पायंडा पडेल असा विश्वास विद्यमान अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केला. ऊस उत्पादक सभासद आणि नवनिर्वाचित संचालकांचे सहकार्य यासाठी लाभणार आहे ते निश्चित मिळेल असेही त्या यावेळी म्हणाल्या.
बिनविरोध विजयी संचालक नावे
बिनविरोध विजयी संचालक: पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या गटाचे बिनविरोध निवडून आले आहेत. पांगरी गट - श्रीहरी मुंडे, रेशीम नाना कावळे, ज्ञानोबा भगवान मुंडे, नाथरा गट - सतीश मुंडे, राजेश गिते, अजय मुंडे, परळी गट - पांडूरंग फड,हरिभाऊ गुट्टे,सचिन दरक, सिरसाळा गट - सुरेश माने, वसंत राठोड, चंद्रकेतु कराड, धर्मापूरी गट - शिवाजीराव गुट्टे, शिवाजीराव मोरे, सुधाकर सिनगारे, सहकारी संस्था मतदारसंघ - सत्यभामा उत्तमराव आघाव, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी - मंचक घोबाळे, महिला प्रतिनिधी - पंकजाताई मुंडे, ॲड. यशःश्रीताई मुंडे, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी - केशव माळी, भटक्या विमुक्त जाती जमाती.
हेही वाचा -
- Pankaja Munde Vs Dhananjay Munde वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी मुंडे बहीण भावात पुन्हा संघर्ष
- Dhananjay Munde on Pankaja Munde धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना आव्हान म्हणाले तुमच्यात ऐपत असेल तर