महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परळी विधानसभा : धनंजय मुंडेंकडून रोजगार निर्मिती, तर पंकजांचा सुरक्षेच्या मुद्द्यावर भर - भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा वेग वाढताना दिसत आहे. परळीतील मुंडे बंधु भगिनी यांच्यातील संघर्षात, धनंजय मुंडेंनी रोजगारनिर्मिती तर पंकजा मुंडे यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर भर दिला आहे.

परळी विधानसभा मतदारसंघ

By

Published : Oct 7, 2019, 4:45 PM IST

बीड - राज्यात सध्या विविध विधानसभा मतदारसंघात प्रचाराला वेग येताना दिसत आहे. प्रमुख पक्षाचे उमेदवार पक्षाचा अजेंडा आणि स्थानिक मुद्द्यांना घेऊन मतदारांमध्ये जाताना दिसत आहेत. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघात मात्र दरवर्षीप्रमाणे चुरशीची लढत होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी शहरातील रोजगार निर्मितीचा मुद्दा पुढे आणलाय, तर भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी परळी शहराच्या सुरक्षेच्या मुद्यांवर भर दिला आहे.

हेही वाचा... नोबेल २०१९ : 'यांना' मिळाला 'शरीरविज्ञान/ वैद्यकशास्त्र' विषयातील नोबेल पुरस्कार!

बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी लढत होते ती परळी मतदारसंघात. धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशी येथील लढत होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले धनंजय मुंडे यांनी या ठिकाणी रोजगाराचा मुद्दा पुढे केला आहे. एका मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी, 'परळीमध्ये दोनच प्रश्न महत्वाचे आहेत. त्यात एक शेतकर्‍यांचा आणि दुसरा बेरोजगारांचा. मतदारसंघातील संपूर्ण बेरोजगारी संपवून टाकण्यासाठी दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी पाहिलेले एमआडीसीचे स्वप्न मी पुर्ण करणार', अशी ग्वाही दिली आहे. परळी शहरात मागील दहा वर्षात एकही नवीन उद्योग उभारलेला नाही. या उलट जे उद्योग सुरू आहेत ते बंद पडताना दिसत आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी प्रचारा दरम्यान केली आहे.

हेही वाचा... महायुतीत रासपवर अन्याय झाला - महादेव जानकर​​​​​​​

दुसरीकडे धनंजय मुंडेच्या विरोधात त्यांची बहीण पंकजा मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात 'डोअर टू डोअर' दौरे सुरू करत प्रचाराला सुरूवात केली आहे. आपल्या प्रचारात पंकजा या प्रामुख्याने परळी तालुक्याच्या सुरक्षेचा मुद्दा मतदारांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. 'गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. त्यासाठी परळी तालुक्यातील जनतेने माझ्या पाठीशी उभे रहावे असे', असे आवाहन पंकजा मुंडे करताना पाहायला मिळत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details