महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंकजा मुंडेंचे अंगरक्षक गोविंद मुंडे यांचे कोरोनाने लातुरमध्ये निधन

माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांचे अंगरक्षक गोविंद नारायण मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. लातुर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अचानक रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

Pankaja munde
पंकजा मुंडे आणि त्यांचे अंगरक्षक

By

Published : Apr 22, 2021, 12:34 PM IST

Updated : Apr 22, 2021, 2:59 PM IST

परळी वैजनाथ (बीड) - भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे व खा. डॉ. प्रितम मुंडे यांचे अंगरक्षक गोविंद नारायण मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. लातुर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असतांना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे दुःखद निधन झाले.

दहा दिवसांपूर्वी गोविंद नारायण मुंडे यांना कोरोनाची लागण झाली होती. लातुर येथे एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना अचानक रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. परळी तालुक्यातील मौजे कन्हेरवाडीचे गोविंदराव मुंडे हे रहिवासी होते. राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे अंगरक्षक म्हणून ते गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होते. अतिशय प्रेमळ आणि सुस्वभावी असलेल्या मुंडेंचे सर्वांशी चांगले संबध होते. अंगरक्षक गोविंदराव मुंडे यांचे निधन झाल्याने सर्वत्र शोक भावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, भाऊ, एक मुलगा, दोन मुली असे कुटुंब आहे.

Last Updated : Apr 22, 2021, 2:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details