महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दिलासादायक! बीडमध्ये 38 पैकी 36 अहवाल कोरोना निगेटिव्ह तर, दोन अनिर्णित

रविवारी प्राप्त झालेल्या नमुन्यांचा अहवाल दिलासादायक आहे. यातील ३८ नमुन्यांपैकी ३६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर, दोन नमुने अनिर्णित आहेत. यामुळे बीड जिल्ह्याला दिलासा मिळाल्यासारखे चित्र आहे. आजघडीला जिल्ह्यात कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २६ झाली आहे.

38 पैकी 36 नमुने कोरोना निगेटिव्ह
38 पैकी 36 नमुने कोरोना निगेटिव्ह

By

Published : May 31, 2020, 9:08 PM IST

बीड - जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी 38 व्यक्तींचे कोरोना तपासणी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यापैकी 36 नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर, 2 नमुन्यांचा रिपोर्ट अनिर्णित असून, सध्या जिल्ह्यात 26 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

मागील आठवड्यात बीड जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले होते. विशेष म्हणजे मुंबई-पुणे येथून जिल्ह्यात परतलेल्या नागरिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अधिक असल्याने धोकादायक स्थिती निर्माण झाली होती. मात्र, हळूहळू यात बदल होत आहे. जिल्ह्यातून आतापर्यंत ३० रुग्ण कोरोनमुक्त होत असतानाच रविवारी प्राप्त झालेल्या नमुन्यांचा अहवाल दिलासादायक आहे. यातील ३८ नमुन्यांपैकी ३६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर, दोन नमुने अनिर्णित आहेत. यामुळे बीड जिल्ह्याला दिलासा मिळाल्यासारखे चित्र आहे. आजघडीला जिल्ह्यात कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २६ झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details