महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड जिल्हा रुग्णालयातील 'त्या' दोन रुग्णांच्या मृत्यूची तातडीने चौकशी करण्याचे आदेश - रुग्णांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश बीड

अज्ञात व्यक्तीने ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने, बीड जिल्हा रुग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तशा तक्रारी प्राप्त झाल्या असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

धनंजय मुंडे
धनंजय मुंडे

By

Published : Apr 25, 2021, 11:06 PM IST

बीड -अज्ञात व्यक्तीने ऑक्सिजन पुरवठा बंद केल्याने, बीड जिल्हा रुग्णालयातील दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तशा तक्रारी प्राप्त झाल्या असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने चौकशी करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

'...तर दोषींवर कारवाई'

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असताना, आरोग्य यंत्रणा दिवसरात्र एक करून याविरोधात लढा देत आहेत. या काळात प्रत्येक व्यक्तीचा जीव महत्त्वाचा असून, तो वाचविण्यासाठी आरोग्य यंत्रणेची धडपड सुरू आहे. दरम्यान अशा परिस्थितीमध्ये जिल्हा रुग्णालयात अज्ञात व्यक्तीने ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे दोन रुग्ण दगावल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमधून येत आहेत, तसेच याबाबत आपल्याकडे काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी असे मुंडे यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या गोष्टीत तथ्य असेल तर दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details