महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Abdul Sattar In Beed : नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे प्रशासनाला आदेश, कृषिमंत्री अब्दुल सत्तारांची बीड जिल्ह्यात पाहणी - बीड जिल्ह्यातील शेतीचे नुकसान

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि गारपीटग्रस्त भागाची मी स्वतः पाहणी केली. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणचं 99 टक्के नुकसान झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. तसेच अस्मानी संकटाचा मुकाबला करणाऱ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे, सरकार तुमच्या पाठीशी आहे. लवकरच तुम्हाला मदत केली जाईल, असे आश्वासन अब्दुल सत्तार यांनी बीडमध्ये बोलताना दिले.

Abdul Sattar In Beed
अब्दुल सत्तार शेतीची पाहणी करताना

By

Published : Apr 9, 2023, 8:31 PM IST

Updated : Apr 9, 2023, 9:10 PM IST

शेतीच्या नुकसानीबाबत बोलताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार

बीड: यावेळी बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, कृषी अधिकारी बाळासाहेब जेजुरकर यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी तहसीलदार यांची उपस्थिती होती. अतिवृष्टी गारपिट आणि अवकाळी मुळे हवालदील झालेल्या शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार खंबीर आहे. नुकसानीचे तंतोतंत पंचनामे करून महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ ज्या ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे. त्या सर्व भागातील शेतकऱ्यांना आसमानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी हात जोडून माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे.


बीड जिल्ह्यात गारपीट: राज्यभरात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बीड जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज-खरबूज आणि भाजीपाला वर्गीय पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे. बीड तालुक्यात आज अर्धा तास झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्याच होत्याचे नव्हते झाले आहे. बीड शहराजवळ असलेल्या भास्कर गिराम यांच्या शेतातील 1 एकर टरबूज आणि 1 एकर मिरची या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे. तर बीड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांचे ज्वारी, गहू, हरभरा, मिरची त्याचबरोबर फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

नुकसानीची भरपाई तात्काळ द्या: बीड जिल्ह्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. शेतकऱ्यांच्या गहू, ज्वारी, हरभरा व आंब्याच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष यांनी शनिवारी केली आहे.

हरभरा भिजला, रब्बी पिकांचे नुकसान: बीड जिल्ह्यातील शेतकरी या ना त्या संकटात सातत्याने अडकत आहे. यावर्षी रब्बीची पिके काही प्रमाणात चांगली आली होती. मात्र अचानक 18 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यात पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे ज्वारीची पिके आडवी झाली आहेत. याशिवाय शेतकऱ्यांचा हरभरा देखील अवकाळी पावसामुळे भिजला आहे. बीड जिल्ह्यात रब्बी पिकाच्या उत्पादनावरच शेतकरी पुढच्या वर्षी चे नियोजन करत असतो. मात्र अवकाळी पावसाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्याचे गणित बिघडले आहे. शासनाने तात्काळ बीड जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व मदत जाहीर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे शनिवारी केली.

हेही वाचा:AJit Pawar On Adani Photo Controversy: 'त्या' फोटो संदर्भातील प्रश्नावर अजित पवार संतापले; म्हणाले, 'अंडरवर्ल्ड लोकांसोबत तर नाही ना...'

Last Updated : Apr 9, 2023, 9:10 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details