महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारने बहाणे बंद करून तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी - देवेंद्र फडणवीस - तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी

शेतकरी हा खऱ्या अर्थाने संकटात सापडला आहे. काही ठिकाणी अद्याप पंचनामे झालेले नाहीत, सरकारने अनेक नियम लावले असून त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आला आहे. सरकारने बहाणे बंद करून तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस

By

Published : Oct 20, 2020, 10:40 PM IST

बीड- मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अद्याप शेतात पाणीच-पाणी साचलेले आहे. शेतकरी हा खऱ्या अर्थाने संकटात सापडला आहे. काही ठिकाणी अद्याप पंचनामे झालेले नाहीत, सरकारने अनेक नियम लावले असून त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणीत आला आहे. सरकारने बहाणे बंद करून तत्काळ सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून याची पाहणी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी विधान सभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बीडच्या केज मतदारसंघात दौरा होता. अंबाजोगाई येथे मंगळवारी शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणले की, शेतकऱ्यांसाठी सरकारने नियम बदलावेत, शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई मिळणे गरजेचे आहे. यावेळी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, आमदार नमिता मुंदडा, आमदार सुरेश धस, आमदार लक्ष्मण पवार, आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details