बीड - राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. बीड जिल्ह्यात खबरदारी म्हणून प्रशासन सरसावले आहे. लग्न समारंभ करण्यासाठी केवळ 50 जणांची उपस्थिती बंधनकारक करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याचा फटका लग्न समारंभावर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांना बसला असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळाले. यामध्ये फुल विक्रेते, वाजंत्री, मंगल कार्यालय चालक, फोटोग्राफर यांचा धंदा बुडाला असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
आता जर पुन्हा लॉकडाउन लावण्याची वेळ आली तर सर्वसामान्य नागरिकांची उपासमारी निश्चित आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच छोटे-छोटे व्यावसायिक आता हातघाईला आले असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. कोरोनाचे संकट अधिक गतीने वाढू नये यासाठी बीड जिल्हा प्रशासनाने केवळ 50 नागरिकांच्या उपस्थितीत विवाह सोहळे करण्याबाबत बंधन घातले आहे. याचा फटका छोट्या व्यावसायिकांना बसला आहे. यामध्ये बीड येथील रसीद फुल स्मार्टचे प्रमुख रशीद भाई म्हणाले की, 2020 चा मार्च महिन्यामध्ये लग्नसराईच्या तोंडावरच कोरोनाचे संकट आले होते. संपूर्ण वर्षभर आमच्या फुल विक्रीवर विपरीत परिणाम झाला. आता या वर्षी तरी चांगला धंदा होईल अशी अपेक्षा होती. मात्र अचानक मार्च महिना सुरू होण्यापूर्वीच कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे यंदाची लग्नसराई देखील होईल याची शक्यता नाही. यातच बीड जिल्हा प्रशासनाने लग्नसमारंभासाठी केवळ 50 नागरिकांची उपस्थिती बंधनकारक केली आहे. त्यामुळे आमच्या या फुल विक्री व्यवसायाला मोठा फटका बसला असल्याचे फुल विक्रेते रशीद भाई म्हणाले.
मंगल कार्यालय चालकांना बुकिंग रद्द कराव्या लागल्या-