बीड -जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे. तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 42 जणांच्या स्वॅबपैकी शुक्रवारी आष्टी तालुक्यात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तसेच 34 अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर उर्वरित 6 अहवाल प्रलंबित आहेत.
आष्टी तालुक्यात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; 'त्या' मृत तरुणाचा अहवाल निगेटिव्ह
जिल्ह्यात चार दिवसापासून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला लगाम बसला आहे. तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 42 स्वॅबपैकी शुक्रवारी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
गुरुवारी रात्री एका 19 वर्षीय तरुणाचा जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डमध्ये स्वॅब घेतल्यानंतर अहवाल येण्याआधीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र त्या तरुणाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला.
जिल्ह्यात चार दिवसापासून कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला लगाम बसला आहे. तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 42 स्वॅबपैकी शुक्रवारी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. आरोग्य विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबई येथून आला असून त्याचे वय 37 वर्ष आहे. सहा व्यक्तींचे रिपोर्ट प्रलंबित आहेत. शुक्रवारी बीड जिल्ह्यात केवळ एकच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.
जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 30 वर जाऊन पोहोचली आहे. माजलगाव तालुक्यात सर्वाधिक 15 ,बीड 5, केज 2 , पाटोदा 3, गेवराई 2, धारूर 1, वडवणी 1, आष्टी-1 अशी रुग्ण संख्या आहे.