ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बीड: प्लायवूडच्या गोदामात स्फोट; एक ठार, दोन जखमी - Beed Jijamata Chowk Champawati Hardware Plywood News

बीड शहरातील जिजामाता चौकातील चंपावती हार्डवेअरचे प्लायवूड ठेवण्याचे गोदाम आहे. या गोदामात अचानक कुठल्यातरी रसायनाचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनिरुद्ध पांचाळ हा तीस वर्षाचा युवक जागीच ठार झाला आहे. तर, सुधीर जगताप व किसन मुणे हे दोघे जण गंभीर जखमी असून बीड जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बीड प्लायवूड गोदाम स्फोट न्यूज
बीड प्लायवूड गोदाम स्फोट न्यूज
author img

By

Published : Dec 18, 2020, 2:57 PM IST

Updated : Dec 18, 2020, 3:05 PM IST

बीड -शहरातील जिजामाता चौकातील चंपावती हार्डवेअरच्या प्लायवूडच्या दुकानाच्या गोदामात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. तर दोघेजण जखमी असून बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. हा स्फोट नेमका कुठल्या रसायनामुळे झाला याचा तपास सुरू असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी स्वप्निल राठोड यांनी सांगितले आहे.

बीड : प्लायवूड गोदामात स्फोट

हेही वाचा -बारामती; दीड वर्षापूर्वी चोरीस गेलेले 50 किलो केस मिळाले परत.....


याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, बीड शहरातील जिजामाता चौकातील चंपावती हार्डवेअरचे प्लायवूड ठेवण्याचे गोदाम आहे. या गोदामात अचानक कुठल्यातरी रसायनाचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात अनिरुद्ध पांचाळ हा तीस वर्षाचा युवक जागीच ठार झाला आहे. तर, सुधीर जगताप व किसन मुणे हे दोघे जण गंभीर जखमी असून बीड जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोदामाच्या शेजारी श्री महालक्ष्मी रुग्णालय आहे. या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, या रुग्णालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.


नेमका स्फोट कशाचा?

बीड येथील चंपावती हार्डवेअर यांच्या प्लायवूडच्या गोदामात रसायने एका ठिकाणाहून दुसरीकडे हलवण्याचे काम सुरू होते. या प्लायवूडच्या दुकानात झालेला स्फोट नेमक्या कोणत्या रसायनामुळे झाला आहे, याचा तपास शहर पोलीस करत आहेत. बॉम्बशोधक पथकाला देखील पाचारण करण्यात आले आहे. तसेच, गृहविभागाच्या रसायन तज्ज्ञांनादेखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले असल्याचे पोलीस अधिकारी राठोड म्हणाले.

हेही वाचा -व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लाच घेणारी 'ती' महिला पोलीस निलंबित

Last Updated : Dec 18, 2020, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details